नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : रामप्रहर वृत्त
नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमधील पटेल पार्क येथील कचरा आणि ड्रेनेज सफाई करण्यात आले. या परिसरात अनेक नागरी समस्या होत्या. याबाबत येथील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने या समस्यांचे निकारण केले.
पनवेलमधील पटेल पार्क येथे रिडेव्हलपमेंटसाठी बंद इमारतीच्या मागच्या बाजूला ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले होते. डासांचा आणि दुर्गंधीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला होता. नागरिकांनी आपली समस्या नगरसेवक तथा माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांना सांगितली. नागरिकांच्या आरोग्यविषयक धोका लक्षात घेऊन त्वरित महापालिका अधिकार्यांना सांगून सफाई करून घेतली. या ठिकाणी जंतुनाशक पावडर सफाई केलेल्या जागेवर मारून घेतली.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारा नगरसेवक लाभल्याबद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.