Breaking News

माणगावात वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी

माणगाव : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्ग माणगाव शहरातून जातो. शहरातील या महामार्गाच्या दुतर्फा जागोजागी वाहने उभी केली जात असल्याने तसेच सुटीच्या दिवशी चारचाकी वाहनांचे चालक शहरातील महामार्गावर तिसरी लाइन काढत असल्यामुळे माणगावात हमखास वाहतूक कोंडी होते. या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारल्यास येथील वाहतूक सुरळीत सुरू राहील. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे. सणासुदीच्या दिवसांत तसेत प्रत्येक शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी माणगावातील या महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची अधिक वर्दळ असते. त्या वेळी वाहनचालक  माणगावात तिसरी लाइन काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. शहर व जवळपासच्या गावांतील दुचाकींना जाण्यासाठीदेखील ते जागा ठेवत नाहीत. या बेशिस्त चालकांमुळे माणगावात वाहतूक कोंडी होते. माणगावातील शेलार नाका, जुने स्टॅण्ड, नवीन स्टॅण्ड, निजामपूर फाटा, एकता पेट्रोल पंप, ढालघर फाटा, निकम स्कूलकडे जाणारा रस्ता येथे पोलीस उभे करून वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील जनतेकडून होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply