Breaking News

भाताणमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) करण्यात आले.
भूमिपूजनाच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, भाताण गावात सुरू झालेल्या या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पाहण्यासाठी जिल्ह्यातून लोकं आली पाहिजेत असे काम करा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेमुळे भाताण आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा संकल्प लवकरच पूर्ण होईल.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत सांगताना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोरोना लस आपल्या देशात तयार झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ती मोफत उपलब्ध होऊ शकली, असेही या वेळी त्यांनी सांगितले.
भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक बबन मुकादम, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती वसंत काठावले, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच सुभाष भोईर, उपसरपंच केशव गायकर, सदस्य तानाजी पाटील, मनीषा जुमारे, मंदा ठाकूर, अस्मिता काठावले, रेश्मा भोईर, सुनील सते, तसेच किरण माळी, प्रिया मुकादम, अविनाश गाताडे, प्रवीण ठाकूर, प्रवीण खंडागळे, रामचंद्र पाटील, गुरुनाथ खारके, दत्तात्रेय पाटील,  भरत पाटील, अनिल भोईर, सुभाष मुकादम, दीपक दुर्गे, रूपेश भोईर, समीर भोईर, अरुण म्हस्कर, स्वप्नील भोईर, गणेश जुमारे, चंदर भोईर, महेंद्र गोजे, महादेव पाटील, अनिल पाटील, महादेव कांबळे, राम हातमोडे, विकास जुमारे, संतोष करवले, कमलाकर भोईर, सुरेश भोईर, कमलाकर जुमारे, नामदेव पाटील, गणेश आडिवले, अनंता म्हामुणकर, अरुण पाटील, चंद्रकांत मुकादम, दीपक ठाकूर, अनिल काठावले, देविदास पाटील, वामन पाटील, दीपक जुमारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply