Breaking News

केंद्रात पुन्हा मंत्री असेन -गीते

पोलादपूर : प्रतिनिधी

आता केंद्रात मंत्री आहे, निवडणुकीनंतरही केंद्रात पुन्हा मंत्री असेन, असा विश्वास महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी देवळे (ता. पोलादपूर) जिल्हा परिषद गणातील पितळवाडी येथील प्रचार सभेत व्यक्त केला.

पोलादपूर तालुक्यात डेअरी आणि फळप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी मुंबै बँकेच्या मार्फत प्रयत्न करून बेरोजगारी आणि स्थलांतरावर उपाय शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मागील लोकसभा निवडणूकीत गीते यांना तीन विधानसभा मतदार संघात मताधिक्य होते, ते यावेळी श्रीवर्धन, गुहागर, महाड, दापोली व पेण या पाचही मतदार संघांमध्ये सर्वाधिक दिसून येईल, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. आमदार प्रवीण दरेकर यांनी शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली.

पोलादपूर तालुक्याने नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहून विजयास हातभार लावल्याचा इतिहास आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी केले.

शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांनी प्रास्ताविक केले. मागील विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार उदय आंबोणकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज भागवत, जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले, शिवसेना संपर्कप्रमुख सुभाष पवार, विनायक मालुसरे, दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांचीही भाषणे झाली.

महाडचे माजी उपनगराध्यक्ष संदीप ठोंबरे, कापडे बुद्रुक सरपंच सुवर्णा सकपाळ, माजी उपसभापती नारायण अहिरे, शिवसेनेचे प्रभारी उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, महिला आघाडी जिल्हा संघटक वैशाली भुतकर, युवा सेना तालुकाअधिकारी संजय कळंबे, भाजपचे प्रसन्ना पालांडे तसेच   किशोर जाधव, सुधीर महाडीक, राजन धुमाळ, अश्विनी गांधी, राजू रिंगे, संजय उतेकर, बळीराम महामुनी, विनायक मालुसरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार या प्रचार सभेला उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply