Breaking News

आलिशान गाडीसह मद्यसाठा हस्तगत

पनवेल : वार्ताहर

आलिशान गाडीसह देशी-विदेशी मद्याचे दोन बॉक्स जवळ बाळगणे तसेच विक्री करणे या गुन्ह्यांतर्गत पनवेल शहर पोलिसांनी दोघा विरोधात कारवाई केली आहे. तालुक्यातील कोळखे गाव परिसरात आरोपी रोहन म्हात्रे (33) व मिरज मोरया (25) हे त्यांच्या स्वतःजवळ देशी-विदेशी मद्यसाठा बाळगून असून तसेच त्याची विक्री करीत असल्याची खबर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकून त्यांच्याजवळ असलेली आलिशान गाडी व मद्यसाठा असा एकूण 20 लाख चार हजार 990 रुपये किंमतीचा गाडीसह माल हस्तगत केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply