Breaking News

अनंत गितेंच्या प्रचारासाठी महायुती एकवटली

झोतीरपाडा विभागातून मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार

पाली : प्रतिनिधी

रायगड लोकसभा निवडणुकीतील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांना झोतीरपाडा विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणार असल्याचा निर्धार शिहू, झोतीरपाडा बेणसे विभागातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

अनंत गिते यांच्या प्रचारासाठी अशोक भोय यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शाखाप्रमुख मोहन भोय यांच्या निवासस्थानी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी, महायुतीची ताकत व जनतेच्या पाठिंब्याने अनंत गितेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे दावा केला.

विकासदृष्टी असलेल्या अनंत गीते यांना केंद्रिय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी जनतेला अपेक्षित विकास घडवून या संधीचे सोने केले. या निवडणूकीत गिते यांना अत्यंत पोषक वातावरण असल्याने ते प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास किशोर जैन यांनी व्यक्त केला.

महायुतीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते अनंत गीते यांच्या विजयासाठी रक्ताचे पाणी करुन, भुक तहान विसरुन प्रचार करीत आहेत. त्यामुळे गीते यांचा विजय निश्चीत असल्याचे मत जिपचे माजी विरोधी पक्षनेते तथा भाजप युवा नेते वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केले.

सलग सहा वेळा खासदार म्हणून विजयी झालेले अनंत गिते यावेळी पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून येवून अनोखा विक्रम रचतील, असा विश्वास माजी उपजिल्हाप्रमुख सु. दा. भोय,  कामगार नेते साधुराम मालुसरे, भाजप शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष हिरामण कोकाटे, भाजप संघटक यशवंत कुथे, शिवसेनेचे उप विभाग प्रमुख अशोक भोय आदिंनी या बैठकीत व्यक्त केला.

शिवसेनेचे विभाग प्रमुख हिराजी चौगले, शाखा प्रमुख मोहन भोय, सतिष जवके, राजेंद्र लवटे, संजय भोय, कृष्णा कुथे, बेणसे माजी सरपंच स्मिता कुथे, झोतीरपाडा माजी सरपंच सोनम पाटील, रेखा साबळे, उपसरपंच नरेश पाटील, गणपत खाडे, दत्ता तरे, सुधीर पाटील, सिताराम पाटील, दिपक पाटील, मनोज मोकल, प्रदिप पाटील, संतोष कोळी,

कृष्णा कुथे, सुधाकर वारगे, मोरेश्वर वारगे, बशिर मांढरे, बाळाराम पाटील, भालचंद्र तरे, राजेंद्र वाळंज, महेंद्र तरे, रामचंद्र तरे, हिराजी बोंडेकर, प्रफुल पाटील, संदिप कुथे, चंद्रकांत कुथे, रोहिणी आल्हाट, सागर म्हात्रे आदिंसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला बहुसंख्येने उपस्थीत होते.

दरम्यान, उमेदवार अनंत गिते यांना निवडून आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने व जोमाने कामाला लागले आहेत. गावनिहाय बैठकांच्या माध्यमातून थेट घराघरात मतदारांपर्यंत पोहचून महायुतीचे कार्यकर्ते अनंत गितेंना मत म्हणजे विकासाला मत असल्याचे ठासून सांगत आहेत. महिलांनी देखील प्रचारप्रसारात आघाडी घेतली आहे.

महायुतीची नागोठण्यात जाहीर सभा

महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ गुरुवार (दि. 11) सायंकाळी 6.30 वाजता येथील गांधी चौकात जाहीर सभा होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोर्‍हे व भाजप आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री रविशेठ पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप नेते विष्णू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार्‍या या सभेला महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply