Breaking News

भारतासाठी बॅडन्यूज! रोहित शर्माला दुखापत

मुंबई : प्रतिनिधी

वर्ल्ड कपसाठीच्या टीम निवडीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना भारतासाठी एक बॅडन्यूज आली आहे. भारताच्या स्टार खेळाडूला आयपीएलच्या सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

उपस्थित झाले आहे. सरावादरम्यान स्टार खेळाडू आणि मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्माला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहितने उजवा पाय धरून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ही दुखापत गंभीर नसली, तर तो वर्ल्डकपमध्ये दिसेल. जर ही दुखापत फार मोठी असेल, तर रोहित शर्माला आणि पर्यायाने भारताला मोठा धक्का बसेल.

वानखेडे स्टेडियमवर सरावादरम्यान रोहित शर्माला अचानकपणे मासपेशीत वेदना जाणवू लागल्याने तो मैदानात बसला. वेदनेमुळे त्याने आपले डोके धरले. मैदानात उपस्थित असलेल्या मुंबई टीमच्या वैद्यकीय टीमने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर रोहित ड्रेसिंग रूममध्ये

परतला. रोहितच्या दुखापतीबाबत अजून कोणताही माहिती मिळालेली नाही. रोहित पंजाब विरुद्ध खेळणार की नाही, हे त्याच्या दुखापतीच्या तीव्रतेवरच अवलंबून असणार आहे.

याआधी अशाच प्रकारे भारताचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर जसप्रीत बुमराहला या आयपीएलच्या मोसमात दुखापत झाली होती, परंतु दुखापत फारशी गंभीर नसल्याने त्याने टीममध्ये पुनरागमन केले. भारतीय खेळाडूंना आयपीएलनंतर वर्ल्डकप स्पर्धेत खेळायचे आहे. त्यांच्यावर सलगपणे

मॅच खेळण्याचा दबाव आहे. त्यामुळे खेळाडूंना वर्ल्डकपआधी काही काळ विश्रांतीची गरज आहे. वर्ल्डकप स्पर्धेला येत्या 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply