![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/Mahad-3-1024x768.jpg)
महाड : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सत्तेचा वापर फक्त भ्रष्टाचार करण्यासाठीच केला असा सणसनाटी आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी निजामपुर येथील प्रचार सभेत केला. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा सुनील तटकरेंना रायगडच्या जनतेने कायमचे घरी पाठवावे असे आवाहन आमदार दरेकर यांनी यावेळी केले
सीएसआरच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असून, अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात केंद्रीय मंत्री म्हणून आपण यशस्वी ठरल्याचा दावा अनंत गीते यांनी या सभेत केला.
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना निजामपूर विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन आमदार भरत गोगावले यांनी, लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर निजामपूर विभागातील जमिनीचे गैरव्यवहार बाहेर काढू, असा इशारा दिला.
मुस्लिम समाजासाठी पवित्र समजली जाणारी अजान, बांग गहाण ठेवणार्या सुनील तटकरे यांना मुस्लिम सामाजाने त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन उस्मान रोहेकर यांनी केले. तर कोकणचे भाग्यविधाते बॅ. अंतुले यांचे पुत्र नवीद अतुले यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची वेळ का आली, याचा विचार मुस्लिम समाजाने करून आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे सुलतान मुकादम यांनी सांगितले. दक्षिण रायगड युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांचेही यावेळी भाषण झाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी मुंढे, माणगाव तालुका प्रमुख अनिल नवगणे ज्येष्ठ नेते दत्तूशेठ पवार, विभाग प्रमुख प्रसाद गुरव, सुधीर पवार उदय आंबोणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, उपस्थित होते
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजप युतीची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू असल्याने अनंत गीते यांचा विजय निश्चित आहे.
– प्रवीण दरेकर, आमदार