Breaking News

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे द्रोणागिरी डोंगरवरून तिघे कोसळले

उरण : प्रतिनिधी

उरण द्रोणागिरी डोंगरावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्यावर पालवी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दुपारच्या सुमारास काही तरुण हे उरणच्या द्रोणागिरी किल्ल्यावर गेले होते. यावेळेस, त्यांच्या समवेत एक 60 वर्षीय गृहस्थदेखील होते.

याचदरम्यान, डोंगराच्या वरच्या भागात असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने दोन तरुण आणि ज्येष्ठ गृहस्थ हे सैरावैरा पळू लागले. यादरम्यान 800 फूट दरीमध्ये या तिघांना खाली उतरावे लागले. या वेळी तीन जण गंभीर जखमी आणि मधमाशांच्या चावण्याने दुखापतग्रस्त झाले. या घटनेची माहिती मिळताच नवपरिवर्तन संस्थेचे डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घनश्याम पाटील यांनी जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर घटनास्थळी उपचार केले. यानंतर ओएनजीसी, सीआयएसएफ जवानांच्या साहाय्याने तिघांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

यामध्ये, एका जखमी तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून 60 वर्षीय गणेश भोईर हे गंभीर जखमी झाले आहेत. वेळीच घटनास्थळी डोंगरावर जाऊन डॉ. सत्या ठाकरे व डॉ. घन:श्याम पाटील यांनी वेळीच उपचारात केल्याने या तीनही जणांचे प्राण वाचले आहेत. यानंतर जखमींना डोंगरावरून खाली आणल्यावर अँब्युलन्सद्वारे उरण येथील पालवी हॉस्पिटल येथे दाखल केले असून, जखमींचा धोका टळला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

फसवणूक करून गाड्या विकणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर

तुमची चार चाकी गाडी भाड्याने लावून देतो असे सांगून व त्या बदल्यात तुम्हाला दरमहा ठराविक रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन देऊन त्या गाड्या परस्पर विक्री करणार्‍या चौकडीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौकडीने आत्तापर्यंत जवळपास 31,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.

ज्ञानेश्वर पेढेकर (रा-डेरवली) यांनी आरोपी राजशेखर चिक्के गौडा यास त्यांच्या मालकीची एर्टीगा गाडी ही 18 हजार रूपयेे महिना भाडे तत्वावर रितसर भाडे करारनाम्याची नोंदणी करून सोपवली होती. आरोपीने स्वतःच्या फायद्या करीता पि सिस्टीम या नावाच्या कंपनीस भाड्याने दिली असल्याचे सांगून गाडीचे साडे तीन महिन्यांचे भाडे थकवून गाडी त्यांना परत दिली नाही. त्याचप्रमाणे पेढेकर यांच्या ओळखीचे मित्र यांनीही अशाचप्रकारे सूरज पाटील, मुस्तफा व जगदीश चौधरी यांच्याकडे गाड्या दिल्या आहेत. या चौकडीने आपआपसात संगनमत करून भाड्याने लावण्यास दिलेल्या गाड्या परस्पर विक्री केल्याने त्यांच्याविरूद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply