Breaking News

अक्षर पटेलने मोडला मेंडिसचा विक्रम

अहमदाबाद ः वृत्तसंस्था 

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांत भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इतक्या विकेट घेतल्या की, पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने तीन सामन्यांतील सहा डावांत 27 विकेट घेतल्या. यासह एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशीही अक्षरने बरोबरी केली. दोषी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1979 साली सहा कसोटी सामन्यांत ही कामगिरी केली, पण अक्षरने फक्त तीन कसोटींत त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताचा पराभव झाला होता. या पहिल्या लढतीच्या काही तास आधी अक्षर पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यानंतर चेन्नईत झालेल्या दुसर्‍या कसोटीत अक्षरने पदार्पण केले आणि मग जे झाले त्याची नोंद फक्त भारतीय नव्हे तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहली जाणार आहे. अक्षरने पुढील तीन कसोटी सामन्यांत धमाकेदार गोलंदाजी केली. त्याने तीन सामन्यांत इतक्या विकेट घेतल्या की वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. अक्षरने पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा अजंता मेंडिस याचा 26 विकेटस्चा विक्रम मागे टाकला. मेंडिसने भारताविरुद्ध 26 विकेट्स घेतल्या होत्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply