Breaking News

खारघरमधील उद्यानांतील खेळण्याचे साहित्य दुरुस्त करा

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील प्लॉट नं. 42ए मधील कै. महादेवबुवा घरत (भजन सम्राट) ज्येष्ठ नागरिक उद्यान व प्लॉ नं. 6 येथील कै. दि. बा. पाटील साहेब उद्यानामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्याच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यामुळे या साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हा सदस्य प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.

खारघरमधील प्लॉट नं. 42ए मध्ये कै. महादेवबुवा घरत (भजन सम्राट) ज्येष्ठ नागरिक उद्यान व प्लॉ नं. 6 येथील कै. दि. बा. पाटील साहेब उद्यान हे सिडको तयार केले आहे. या उद्यानात तसेच लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठांसाठी चालणे, योगा करणे व विरंगुळा केंद्र आहे. त्यामुळे या उद्यानामध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणात येतात तेथे खेळतात, परंतु त्या उद्यानामधील झोपाळे, घसरगुंडी, सिसॉ हे तुडलेले असून काही साहित्यांचे स्क्रू निघलेले आहेत. वस्तूंची मोडतोड झालेली आहे, म्हणून या साहित्यासह उद्यानातील अन्य तुटलेल्या साहित्याची दुरुस्ती करण्यात यावी. जेणेकरून तेथील मुलांना खेळता येईल व त्यांना इजा होणार नाही, असे प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नुमद केले आहे.

दरम्यान, प्लॉ नं. 6 येथील कै. दि. बा. पाटील साहेब उद्यान हे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत झाले आहे तर प्लॉट नं. 42ए मधील कै. महादेवबुवा घरत (भजन सम्राट) ज्येष्ठ नागरिक उद्यान याची हस्तांतरण प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रभाकर घरत यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे उद्यानातील दुरुस्तीसंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply