Breaking News

करंजाडेतील वृक्षांचे संवर्धन करा; भाजपची सिडकोकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

करंजाडेमधील वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी भाजप करंजाडेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडकोचे नवीन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री. पटेल यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्रशासनाकडून 2018 मध्ये करंजाडे शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे शहरास एक वेगळे रूप निर्माण झाले, हरित करंजाडे करण्याच्या दृष्टीने सिडको प्रशासनाचे हे पाऊल कौतुकास्पद आहे, परंतु त्यांनतर वृक्षसंवर्धनाचे कामसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते, मात्र ते कुठेही दिसून आले नाही. परिणामी पाण्याअभावी काही झाडे मरून गेली तर काही अस्ताव्यस्त स्वरूपात वाकलेली दिसून येत आहेत. त्यांची निगा राखुन सुव्यवस्थित वृक्षसंवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे. शहराच्या इतर विकासाबरोबरच उल्लेखीत विषयावर लक्ष दिले तर पर्यावरणपूरक व आल्हाददायक वातावरण निर्माण होईल. वरील विषयावर प्रकर्षाने लक्ष घालुन योग्य उपाययोजनेद्वारे सुंदर करंजाडे हरित करंजाडे करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत माहितीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांना दिली आहे.निवेदन देताना भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, कार्यकर्ते सुनील सांबरेकर, नामदेव चोगले, त्रिशूल राक्षिकार, रोहन वरसोडकर आदी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply