Breaking News

‘कमळ’चा 305 कोटी ठेवींचा जल्लोष

अलिबाग : प्रतिनिधी

ग्राहकाला केंद्रस्थानी माना, ग्राहकाला सेवा देणे हे अतिरिक्त काम न मानता अंगभूत काम माना तसेच आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट्य ठेवून काम करा व निकोप स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, असा गुरुमंत्र कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक मुकुंदराव अभ्यंकर दिला यांनी येथे दिला.

कमळ नगरी सहकारी पतसंस्थेच्या अलिबाग येथील कमळ नगरी सहकारी पतसंस्थेच्या 27 व्या वर्धापन दिनी संचालक, कर्मचार्‍यांच्या संयुक्त मेळाव्यात मुकुंदराव अभ्यंकर मार्गदर्शन करीत होते. कमळ पतसंस्थेचा 27 वा वर्धापन दिन व 305 कोटींच्या मिश्र व्यवसायाचा जल्लोष असा एकत्रित कार्यक्रम योजला होता.  सुरुवातीस पतसंस्थेचे चेअरमन सतिशचंद्र पाटील यांनी पतसंस्थेच्या 27 वर्षांचा कामकाजाचा धावता आढावा घेतला आणि  मार्च 2020 पर्यंत रु.360 कोटींच्या एकत्रित व्यवसायाचे उद्दीष्ट्य जाहीर करुन 2022 पर्यंत रु.500 कोटींच्या मिश्र व्यवसायाचा टप्पा गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. कमळ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी संस्थेच्या प्रगतीची ग्वाही दिली. या कार्यक्रमांत मदतनिसांपासून शाखाधिकारी प्रवर्गातील कर्मचार्‍यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुुंबई येथील हेमंत बर्वे, शैलेश निरगुडकर व पल्लवी केळकर यांच्या गंधार या वाद्यवृंदाचा जुन्या मराठी भावगीतांचा कार्यक्रम झाला. त्याला संस्थेचे भागधारक, हिंतचिंतक व नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply