पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीतून येथील नेरे ग्रामपंचायतीमधील नेरे पाडा ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 25) झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, गोटीराम म्हात्रे, आंबो रोडपालकर, माया म्हात्रे, नाना म्हात्रे, दत्तात्रेय भगत, नंदलाल भगत, कान्हा म्हात्रे, योगेश रोडपालकर, अंकुश रोडपालकर, रवी शेळके, ज्ञानेश्वर म्हात्रे, रोहिदास भगत, रूपेश म्हात्रे, महेंद्र गायकर, शरद काकडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.