Breaking News

अपघातग्रस्त दीपक पाटील यांना आर्थिक मदत; आमदार महेश बालदी यांच्या हस्ते धनादेश

उरण : वार्ताहर

नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वेअर हाऊसमध्ये अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या दीपक महादेव पाटील यांना भाजपच्या पदाधिकार्‍यांनी उपचारासाठी संबंधित कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून दिली आहे. या मदतीचा धनादेश आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पाटील यांना देण्यात आला. काही दिवसापूर्वी नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्राव्हेट लिमिटेड वेअर हाऊसमध्ये फोअरक्लीपच्या धक्क्याने भिंत कोसळून दीपक महादेव पाटील यांचा डावा हात निकामी झाला. घटनास्थळी भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, वशेणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजय म्हात्रे, उद्योजक देवेंद्र पाटील, नामदेव पाटील आदींनी जाऊन कंपनी मालक विशाल गोयल, व्यवस्थापक इम्प्तीयाज शेख शरिफ यांच्याबरोबर आमदार महेश बालदी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार अपघातग्रस्त दीपक पाटील यांना कंपनी मालकाने सहकार्य करण्याचे मान्य केले. त्या पार्श्वभूमीवर सहा लाख रकमेचा धनादेश आमदार महेश बालदी यांच्या हस्ते देण्यात आला. अपघात झाल्यामुळे उपचाराचा सर्व खर्च कंपनी देईल आणि  येणारा मेडिक्लेमची रक्कम दीपक यांनाच देण्यात येईल, तसेच त्याला कामावर घेऊन त्याला पगार चालूच राहील याची ग्वाही देण्यात आली. या वेळी भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर, मनोहर सहतिया उपस्थित होते. आमदार महेश बालदी, भाजप उरण पूर्व विभाग कमिटी व दीपक गावंड यांच्या परिवाराकडून कंपनी मालकांचे आभार मानण्यात आले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply