कर्जत : बातमीदार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार अॅडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी हा कडा सर केला. कर्जत तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी ठरला.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चला झालेल्या या मोहिमेत काही महिला सदस्य पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाल्या होत्या. मोहिमेत सातारा पोलीस दलातील मोनाली निकम, सोलापूर वनविभागातील शीला बडे यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणार्या महिलांनी सहभाग नोंदविला. आदिती व आर्या या लहान मुली होत्या. एकूण 50 महिला व पुरुष सदस्य या मोहिमेत सहभागी होते.
या मोहिमेचे नेतृत्व शिलेदार संस्थेच्या महिला सदस्य कविता बोटाले, शीतल जाधव, अमिता सलियान आणि सिद्धी कदम या महिलांनी केले, तर संस्थेचे प्रमुख गिर्यारोहक सागर नालवडे, विनायक पुरी, प्रदीप मदने, सोपान, शैलेश जाधव, रजनीकांत, प्रीतम यांनी तांत्रिक मदत केली.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …