पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त स्व.ह.भ.प. वासुदेव गोपाळ शेळके व स्व. डॉ. बुधाजी सहदेव शेळके यांच्या स्मरणार्थ आयोजित कुस्ती स्पर्धेत पैलवान रूपेश शिवराम पावशे यांनी अजिंक्यपद पटकावून
मानाची चांदीची गदा जिंकली. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रुपेश पावशे यांचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पाली देवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक पाटील, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 70वा वाढदिवस असून, त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने पाली खुर्द येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा रंगली. या स्पर्धेत पैलवान रुपेश पावशे यांनी खुल्या गटातील स्पर्धेत खोपोलीच्या पैलवानाला नमवून अजिंक्यपदाचा किताब पटकाविले, तसेच या वेळी पावशे यांनी कुस्ती आखाड्यातून निवृत्ती जाहीर केली.
गेली 20 वर्षे रुपेश पावशे यांनी कुस्ती खेळून अनेक स्पर्धा जिंकल्या, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले. त्यामुळे आता स्वतः स्पर्धेत न खेळता यापुढेही कुस्तीपटू तयार करण्याचे काम करण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …