पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेमार्फत खारघरजवळील फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये मोबाइल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 10) झाला. यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी प्रयत्न केले होते. या वेळी आदिवासी वाडीतील महिलांना अन्नधान्याचे वाटपही करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोबाइल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांपासून सिडको अथवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा प्रकारची कोणतीही सेवा या आदिवाडी वाड्यांमध्ये देण्यात आली नव्हती. अखेर नगरसेवकि हर्षदा उपाध्याय यांनी महापालिकेमार्फत ही सेवा सुरू केली आहे. या सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’ अध्यक्ष अनिता पाटील, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक हर्षदा उपाध्याय, भाजप नेते वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, मोना आडवाणी, गीता चौधरी, शामलाल सुरेश, मधुमिता जीना, शोभा मिश्रा, बिना गोगरी, किरण रावडे, अजय जाधव, सचिन गणबाज, सुरेश पारधे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी भारतीय जनता पक्ष आणि नगरसेविका उपाध्याय यांच्या वतीने आदिवासी वाड्यांमधील महिलांना अन्नदान करण्यात आले.