Breaking News

लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे सर्वात्तम; जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांचे प्रशंसोपद्गार

अलिबाग : जिमाका

लोकसभा निवडणूक 2019 चा सर्वंकष आढावा असलेला लोकराज्य विशेषांक हा जनतेसाठी आणि निवडणूक यंत्रणेत काम करणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा अंक ठरणार असल्याचे रायगड  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी  लोकराज्य – राष्ट्रीय महोत्सव  या विशेषांकाचे प्रकाशन करताना सांगितले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने याही उपस्थित होत्या.

 जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ‘स्वीप’मोहीम राबवली गेली. त्याद्वारे आखण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांची माहिती या अंकात देण्यात आली आहे.

-सुलभ संदर्भ

अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी 2009, 2017 च्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रे, एकूण मतदार नोंदणी, पुरुष व महिला मतदारांची संख्या, एकूण मतदार व एकूण झालेले मतदान, पहिल्या पाच उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आदीचा समावेश    आहे.

-आदर्श आचार संहिता

आदर्श आचार संहितेबाबात नेहमी विचारल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या अंकात देण्यात आली आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी ही प्रश्नोत्तरे मार्गदर्शक ठरणारी आहेत. याची सविस्तर माहिती अंकात समाविष्ट करण्यात आली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply