Breaking News

दफनभुमीची स्वच्छता; डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार

रेवदंडा : प्रतिनिधी

रेवदंडा आगर किल्ल्याजवळच असलेल्या दफनभुमी परिसरात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविले होते. त्याबद्दल मुस्लिम समाज बांधवांनी सोमवारी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेवून आभार मानले.

श्री सदस्यांनी रविवारी हातात कोयता, फावडी, कुर्‍हाड, घमेली घेवून रेवदंड्यातील दफनभुमी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. त्यात रेवदंडा मुस्लिम समाज बांधवानी सुध्दा सहभागी होउन परिसरातील झाडी झुडपे, वेली, वाढलेली झाडे, कचरा काढून दफनभुमी परिसर चकाचक केला होता. रेवदंडा मुस्लिम समाजाचे वतीने सोमवारी सकाळी निरूपणकार  डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा निवासस्थानी भेट घेतली व पुष्पगूच्छ देवून दफनभुमी स्वच्छतेबद्दल आभार मानले.  या वेळी नजमुसाकिब लांबाते, रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य खलिल तांडेल, अजगरशेठ गोंडेकर, सलिम तांडेल, लायक गोंडेकर, मुज्जफर मुकादम, जव्वाद मुकादम, अनिस हाजाते, मुब्बशीर तांडेल, आसपास काराणी, सुहास घोणे आदी उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply