

पनवेल : महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा आणि भाजप रायगड जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस इमरान शेख यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अजय बहिरा यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अमरिक सिंग, गोपाल एस. के, राजू दवे, अफताब ताडे, अमन अख्तर, जितू खुटकर, दुशांत डी, भानुदास बहिरा, प्रमोद बहिरा, प्रशांत बहिरा, हरून शेख, सय्यद अकबर, प्रसाद बहिरा, इमरान शेख, श्रेयश बहिरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.