पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी या महोत्सवाला भेट देत कलाकारांचे कौतुक केले. या वेळी महिला व लहान मुलांनी त्यांचे औक्षण करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अजरामर विनोदी नाटक ऑल दि बेस्ट आणि धमाल बहुचर्चित नाटक आज्जीबाई जोरात अशा सुप्रसिद्ध दोन नाटकांचे चार प्रयोग नागरिकांना मोफत पहायला मिळाले.
या नाट्य महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका नीता माळी, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, मयुरेश खिस्मतराव, अभिषेक पटवर्धन, वैभव बुवा, चिन्यम समेळ, प्रितम म्हात्रे, सुहासिनी केकाणे, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, ओरियन मॉलचे मालक मंगेश परूळेकर यांच्यासह निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे, मनपीत पेम, मयुरेश पेम, विकास पाटील, रिया अग्नीहोत्री हे कलाकार उपस्थित होते. त्यांच्या कलेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाद दिली.
चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनात घर करणारा जनतेचा लाडका नेता म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर. दोन दिवसीय नाट्य महोत्सवाच्या शेवटच्या प्रयोगाच्या मध्यंतरामध्ये पनवेलकर महिला आणि छोट्या मुलींनी प्रशांतदादांचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले. केक, मेणबत्या, गुच्छ, हार, भेटवस्तू या सगळ्याला बगल देत आपली संस्कृती आणि परंपरा जतन करत पारंपरिक पद्धतीने औक्षण करून दादांना कायम स्मरणात राहतील अशा शुभेच्छा देण्यात आल्या. याचा त्यांनी मन:पूर्वक स्वीकार केला.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …