Breaking News

उरण करंजा येथील परिसर सील

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील करंजा येथील सुरकीचापाडा येथे राहणारा 43 वर्षीय व्यक्ती शुक्रवारी (दि. 8) कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याचे आढळून आले. या रुग्णाला एमजीएम हॉस्पिटल, कामोठे (पनवेल) येथे दाखल करण्यात आले आहे. त्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 77 व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे.

रुग्णाच्या घराच्या पूर्वेला शंकर अर्जुन कोळी यांच्या घरा शेजारील गल्ली तसेच गोरख आयत्या पाटील व हरिचंद्र आयत्या पाटील यांच्या घरामधील गल्ली, पश्चिमेला प्रभाकर गजानन थळी व रवींद्र धर्मा थळी तसेच दयानंद हॉटेलची गल्ली, यांच्या घरामधील गल्ली दक्षिणेला किशोर काशिनाथ म्हात्रे व संजय धनाजी चव्हाण यांच्या दुकानामधील गल्ली तसेच मच्छिंद्र बाळाराम पाटील ते जितेंद्र हरी नाखवा यांच्या घरा मधील गल्ली व भवानी चौक येथील जेट्टी कडे जाणारा अर्धा रस्ता-उत्तरेला उर्वरित सुरकीचा पाडा आदी परिसर सील करण्यात आला आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडल्यास व अन्य ठिकाणी स्थारांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.  

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply