Breaking News

जागतिक दिव्यांग टी-10 स्पर्धा; सहदेव बर्डे, ऋषिकेश पाटील दिल्लीला रवाना

धाटाव : प्रतिनिधी
भारतातील सर्वांत मोठी जागतिक दिव्यांग टी-10 पुरुष क्रिकेट स्पर्धा देशाची राजधानी दिल्लीत नोयडा येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात रायगड जिल्ह्याचे दोन स्टार प्लेअर खेळणार आहेत. त्यापैकी एक आहे रोहा तालुक्यातील वाशी गावचा सुपुत्र, अष्टपैलू खेळाडू सहदेव बर्डे आणि दुसरा खारगावचा ऋषिकेश पाटील. हे खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले. यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग, विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे यांच्यासह अनेकांनी रायगडच्या रत्नांवर शुभेच्छाचा वर्षाव केला. दरम्यान, गेल्याच महिन्यात नागपूर येथील कोशिश प्रीमियर लीग टी-10 स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेत सहदेव बर्डे याने अष्टपैलू कामगिरी बजावली होती. या वेळीसुद्धा महाराष्ट्र संघ जागतिक दिव्यांग टी-10 क्रिकेट स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने करून पुन्हा प्रथम क्रमांक पटकाविणार असून, यात रायगडचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास बर्डे याने व्यक्त केला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply