Breaking News

पालीच्या अनुज सरनाईकने साकारली ‘सुवर्ण’ कामगिरी

पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सुयश

सुधागड ः प्रतिनिधी
पिंच्याक सिलाट राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि. 14) कर्जत येथील वरणे येथे झाली. या स्पर्धेत 75 ते 80 वजनी गटात पालीतील अनुज सरनाईक याने सुवर्णपदक पटकाविलेे. त्यामुळे त्याची 24 ते 26 मार्चला श्रीनगर येथे होणार्‍या वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय पिंच्याक सिलाट निवड चाचणी स्पर्धा महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनतर्फे घेण्यात आली. लॉकडाऊननंतरची पहिलीच स्पर्धा आणि 2021मधील पहिले सुवर्णपदक मिळाल्याने खूप आनंद होत आहे, असे अनुज सरनाईक याने पत्रकारांना माहिती देताना सांगितले. अनुजचे गुरू भारतीय पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनचे सचिव किशोर प्रकाश येवले यांनीही त्याचे अभिनंदन केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply