उरण : वार्ताहर
मुंबई शहराप्रमाणे इतर शहरात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. उरण तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पुढील काळात कोरोनामुक्त उरण करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी नागरिकांना केली आहे. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे किंवा कोणत्याही व्याधींनी ग्रस्त असल्यास व त्यांचे वय 45 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अशा व्यक्ती कोविड लस घेण्यास पात्र आहेत. लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणी करिता भाजप कार्यालय, गणपती चौक, उरण येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत संपर्क साधावा. तुम्ही आणि मी मिळुन, करूया कोरोनामुक्त उरण, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांना माहिती व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाने उरण शहरात ठिकठिकाणी बॅनर लाऊन जनजागृती केली आहे.