Breaking News

भाजपचा महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी

भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सोमवारी (दि. 15) सोशल मीडियातून हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार लबाड असून, या सरकारने जनतेला त्रस्त करून सोडल्याची टीका भाजपने केली आहे. ट्विटरवर एकामागोमाग एक असे ट्विट करीत भाजपने राज्य सरकारवर वाग्बाण सोडले. लबाड महाविकास आघाडी सरकारने जनतेला चहूबाजूंनी त्रस्त करून सोडले आहे. जनसामान्य, शेतकरी, वीज ग्राहकांना शॉक अशा कारनाम्यानंतर या सरकारने आदिवासींबाबतही कशी फसवेगिरी केली, हे आता स्पष्ट झालेले आहे. हे सरकार न्याय देईल अशी आशा कुठल्याच समाजघटकाला आता वाटत नसेल. असे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर करण्यात आले आहे. भाजपने सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेना आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे यांना 10 दिवसांची एएनआय कोठडी मिळाली. पोलिसांची इनोव्हा तिथे कशी? अटक झालेले वाझेच या प्रकरणाचे तपास अधिकारी कसे? संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालताहेत? वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावे घेतली? ठाकरे सरकार हे सगळे स्पष्ट होईल, हिरेन कुटुंबाला न्याय मिळेल, असे भाजपने म्हटले आहे. शिवसेनेच्या लाडक्या सचिन वाझे यांचा सहभाग होता ते मनसुख हिरेन प्रकरण तपास एएनआयकडे देण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. खासदार संजय राऊत यांनीही मुंबई पोलीस, एटीएस सक्षम वाटत होतेच, मात्र भीमा कोरेगावचा तपास त्याच मुख्यमंत्र्यांनी परस्पर एएनआयकडे दिला. असे दुसरे ट्विटही भाजपच्या अकाऊंटवरून करण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफी, वीज बिलाच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रश्नांसंदर्भातही ट्विट टाकून भाजपने राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply