उरण : वार्ताहर
युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड टेक्नोलॉजीमध्ये ’तरंग’ फेस्टिव्हल जल्लोषात नुकताच साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.
फेस्टिव्हल मेहंदी, टॅटू, क्वीझ, टीक-टॉक, स्पॉट फोटोग्राफी, ब्राइडल मेकप तसेच नेल आर्टस्, ग्रिंटीग कार्ड, ट्रेझर हण्ट, ब्लॉग डिझाइन, बॉलिवुड डे, पारंपारिक वेशभूषा इत्यादी रंगीबेरंगी खेळांची व स्पर्धांची रेलचेल होती.
‘तरंग’ मध्ये हया वर्षीसुध्दा तरुणांसाठी उदयोजक मेळावा भरवण्यात आला होता. हॅण्डमेड चॉकलेटस्, सॅन्डविच, गुलाबजाम, कानातले तसेच टीशर्ट, ड्रेसमटेरियल, कॉस्मॅटिक अॅण्ड ज्वेलरी यांचे स्टॉल्स हया मेळाव्यामध्ये विदयार्थ्यांनी
लावले होते. विविध वस्तूची विक्री करुन नफा कमवून, कुशल उदयोजक होण्याचे धडे विदयार्थ्यांनी ह्या निमित्ताने घेतले. ’तरंग’ फेस्टिवलच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच शनिवार (दि.21) ’प्रधान सर ऑडिटोरियम’ मध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंदात व जल्लोषात पार पडला.
युईएस संस्थेच्या माजी प्राचार्या व विश्वस्त सदस्या श्रीमती स्नेहल प्रधान मॅडम, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, खजिनदार विश्वास दर्णे, सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, सिनिअर कॉलेजचे एचओडी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्यासोबत स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स उपस्थित होत्या.
उपस्थित सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कॉलेजातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजयी झालेल्या विदयार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व मेडल देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिनियर कॉलेजचे सर्व शिक्षक व विदयार्थांनी विशेष मेहनत घेतली.