Breaking News

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी पुलावरून एसटी बसेसची वाहतूक करावी

नगरसेविका दर्शना भोईर यांची आगारप्रमुखांकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील एसटी बस स्टॅण्डकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावरील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टीतील नागरिकांच्या सुरक्षेकडे नगरसेविका दर्शना भोईर यांनी एसटी आगारप्रमुखांचे लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी नमूद केले की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील एसटी बस स्टॅण्डकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावरील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी रस्त्यालगत असल्याने येथील नागरिक रस्त्याच्या बाजूस बसतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या एसटी बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने परिसरातील नागरिक वारंवार एसटी वाहनांनी नियमानुसार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरून जावे याकरिता मागणी करीत आहेत. तरी आपण परिसरातील नागरिकांची समस्या आणि सुरक्षेचा विचार करून एसटी बसेसना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरून  वाहतूक करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा

यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …

Leave a Reply