Breaking News

सूर्यकुमारला बाद देण्यावरून विराट भडकला

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या चौथ्या टी-20 सामना खराब पंचगिरीमुळे सध्या चर्चेत आहे. या सामन्यात इंग्लंडला 8 धावांनी धूळ चारत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली, पण सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने खराब अंपायरिंगवर बोट ठेवले. जर खेळाडूला स्वतःला माहित नाहीये की त्याने कॅच पकडला आहे की नाही, तर मैदानावरील पंच आऊट असा सॉफ्ट सिग्नल कसा देऊ शकतात, असे म्हणत विराटने या निर्णयावर टीका केली.
या निर्णयावर नेटिझन्ससोबतच अनेक आजी-माजी खेळाडूंनी ट्विटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने थर्ड अंपायरवर डोळ्यांना पट्टी बांधलेले एक मीम पोस्ट केले आहे, तर वासिम जाफरने यावर थेट आयसीसीलाच प्रश्न विचारला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता सॉफ्ट डिस्मिसल, थर्ड अंपायर आणि त्यांच्याद्वारे घेतले जाणारे निर्णय यावर मोठी चर्चा होऊ लागली आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply