Breaking News

सिडकोच्या जलवाहिनीचे काम पूर्ण

खारघरला होणार मुबलक पाणीपुरवठा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सिडकोच्या वतीने हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत हमरापूर येथे टेकडीच्या खालून जलवाहिनीसाठी बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला. यामुळे खारघर नोडमधील पाणीपुरवठा क्षमतेपेक्षा 10 टक्के इतका वाढणार आहे.
महापौर चौतमोल यांच्यासमवेत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, अनिता पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, हरिष केणी, महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, श्री. तायडे, सिडकोचे अधिकारी राजेंद्र पोतदार उपस्थित होते. ही जलवाहिनी एप्रिल महिन्यामध्ये कार्यान्वित होईल, असे उपस्थित अधिकारीवर्गाने सांगितले.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply