Saturday , June 3 2023
Breaking News

कार रॅलीचे दीपा-प्रियांकाला जेतेपद

मुंबई : प्रतिनिधी

वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या वुमन्स रॅली टू द व्हॅली या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल 87 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

वरळी (मुंबई) ते अ‍ॅम्बी व्हॅली (पुणे) येथे 7 एप्रिलला झालेल्या कार रॅलीत तब्बल 400 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. यात प्रज्ञा चावरकर आणि पारुल शाह यांच्या संघाने दुसर्‍या क्रमांकासह 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. विनिशा सिंग सावंत आणि अयोश्मिता बिस्वास यांनी तिसरा क्रमांक प्राप्त केला. मनीषा गेंद आणि मालू गुप्ता यांच्या संघाने चौथ्या क्रमांकावर मजल मारली. काला चंद्रकांत सोनी आणि हिमानी शर्मा पाचव्या क्रमांकावर राहिल्या, तर मल्लिका राय आणि नेहा खंडेलवाल यांना सहाव्या  क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Check Also

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचे शनिवारी पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य …

Leave a Reply