पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुकापूर येथे समाज मंदिराचे उद्घाटन आणि गटारांच्या कामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबत नेरे येथे धान्य आणि फळांचे वाटप करण्यात आले.
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून सुकापूर येथे जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या समाज मंदिराचे उद्घाटन आणि सुकापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येणार्या गटरांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबत नेरे येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे आणि फळांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भुपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, तालुका अध्यक्ष अप्पा भागीत, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, निलेश भगत, सुकापूर अध्यक्ष राजेश पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, विश्वजीत पाटील, दिनेश खानावकर, शुभ पाटील यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.