Breaking News

मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत काळसेकर महाविद्यालयात लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त

अंजुमन-ए-इस्लाम या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या पनवेलमधील अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक महाविद्यालयात नुकतीच मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोफत लसीकरण अभियानांतर्गत सुमारे 100 विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले.

पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा चांडक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अभियानात वैद्यकीय कर्मचारी डॉ. सरिता महाजन, संजीवनी चोरघे, कविता साळवे यांनी लसीकरण केले, तर काळसेकर पॉलिटेक्निकचे प्रशासकीय अधिकारी आमिर सिवानी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. फेहमिदा सय्यद, युसुफ मुल्ला आणि संबंधित कर्मचार्‍यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.

अंजुमन-ए-इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख, एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुरहान हारिस, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रज्जाक होनुटगी आणि काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो. रमझान खाटीक यांचे मोलाचे मार्गदर्शन या अभियानाला लाभले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply