दिघोडे (ता. उरण) : डब्ल्यू वेअरहाऊसमध्ये शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. यात एसी मशिनरींचे नुकसान झाले आहे.आगीचा भडका वाढल्याने धुराचे लोट दूरवर पसरले होते. उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.
