Thursday , March 23 2023
Breaking News

रायगडात बंद, निदर्शने आणि श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्त

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यातील पाली आणि नेरळमध्ये रविवारी (दि. 17) बंद पाळण्यात आला. या वेळी या हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्याचे सलग तिसर्‍या दिवशी रायगड जिल्ह्यात पडसाद उमटले. सुधागड तालुक्यातील पाली व परळी येथे नागरिकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे रिक्षा चालक मालक संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली व रिक्षा बंद ठेवून दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला. परिसरातील व्यापार्‍यांनीही बंद पाळला.

Check Also

सराईत सोनसाखळी चोरांना अटक

जवळपास पावणेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर खारघर, उलवेसह नवी मुंबई परिसरात …

Leave a Reply