Breaking News

खारघरमध्ये पार्लरवर कारवाई; मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे उघड

पनवेल : वार्ताहर

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्या जाणार्‍या खारघर सेक्टर-3 मधील शगुन फॅमिली स्पावर खारघर पोलिसांनी छापा मारून मसाज पार्लर चालक मालक व मॅनेजर या तिघांवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन मुलींनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खारघर सेक्टर-3 बेलपाडा येथील शुभांगन इमारतीतील शगुन फॅमिली स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-2चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांनी खारघर पोलिसांना दिली होती. तसेच या मसाज पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक विमल बिडवे, महिला पोलीस उपनिरीक्षक अंजना गायकवाड व त्यांच्या पथकाने शगुन फॅमिली स्पामध्ये एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. या वेळी स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्पावर छापा मारला. या वेळी स्पा मध्ये बॉडी मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या दोन मुलींकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करून घेण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी मसाज सेंटरचे मालक पुष्पा नायडु, लक्ष्मी राठोड, मॅनेजर अल्वीन सुभाष डाव या तिघांवर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. तसेच ज्या मुलीच्या माध्यमातून या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात होता, त्या मुलींनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply