पेण : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेण विधी सेवा समिती तर्फे तालुक्यातील वरवणे ग्रामपंचायत हद्दीतील झापडी गावामध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात अॅड. आर. एच. म्हात्रे यांनी कुळकायद्याविषयी आणि अॅड. भक्ती पाटील यांनी महिलांचे अधिकार, कौटुंबिक हिंसाचार याबाबत मार्गदर्शन केले. वरवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदिप तोंडीलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अॅड. गणेश म्हात्रे यांनी विधी सेवा समितीचे कार्याची माहिती दिली. शिबिर यशस्वी होण्यासाठी अॅड. नितिन पाटील यांचे सहकार्य लाभले. वरवणे सरपंच हिराबाई मानकर, उपसरपंच यमुना वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप पाटील, पंचकमिटी अध्यक्ष श्री. मानकर, पोलीस पाटील राजू पाटील, माजी सरपंच रमेश दळवी, श्रावण वाघमारे, गौरी हिलम, गुलाब हिलम यांच्यासह ग्रामस्थ, पेण पोलीस ठाण्याचे कर्मचारी न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.