लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट अंतर्गत धान्य आणि पुस्तके वाटप उपक्रमांचे आयोजन 31 मार्च रोजी करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते 31 मार्च रोजी सकाळी 11.30 वा. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक सत्कर्म श्रद्धालय आश्रमातील 70 निराधार मुले व वृद्धांना धान्य वाटप करण्यात येणार आहे, तर संस्थेचे व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते धामणी येथील ज्ञानाई माध्यमिक विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येईल, अशी माहिती सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत यांनी दिली.