Breaking News

माणगावमध्ये विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

अलिबाग : जिमाका

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13) करण्यात आले. माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या सहकार्यातून अशोकदादा साबळे विद्यालयाची नूतन इमारत साकारली आहे.

आमदार भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास भाजप नेते कृष्णा कोबनाक, संस्थापक अ‍ॅड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा दोशी, स्कूल कमिटी चेअरमन राजन मेथा, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, माणगाव पं. स. सभापती सुजित शिंदे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, जि. प सदस्या अमृता हरवंडकर, माणगावच्या उपनगराध्यक्ष शुभांगी जाधव, नगरसेवक सचिन बोंबले, नितीन बामुगडे, नगरसेविका स्नेहा दसवते, नीलम मेहता, माजी उपसरपंच नितीन दसवते, प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार भरत गोगावले यांनी संस्थेचे कौतुककेले. प्रास्ताविकात संस्थापक अ‍ॅड. राजीव साबळे यांनी संस्थेची इत्यंभूत माहिती दिली.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply