Breaking News

श्रमिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

कर्जत ः बातमीदार

नेरळ शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेरळमधील श्रमिक आणि कामगार क्षेत्रात कार्यरत 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ भाजपच्या वतीने श्रमिक आणि कामगार वर्गातील 15 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

येथील जेनी ट्युलिप शाळेच्या मैदानात आयोजित कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, महिला मोर्चा कर्जत तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दासताने, भाजप महिला मोर्चा तालुका बिनीता घुमरे, कर्जत नगर परिषदेच्या बांधकाम आणि नियोजन समिती सभापती स्वामिनी मांजरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा कराळे, वाकस ग्रामपंचायत उपसरपंच रंजना भागीत यांच्यासह आयोजक भाजप नेरळ महिला मोर्चा अध्यक्ष नम्रता कांदळगावकर तसेच मानसी खेडकर, संजीवनी धुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात भाजपमधील ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.त्यात कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्या सुमित्रा जोगळेकर, माजी मुख्याध्यापिका आसावरी काळे, राष्ट्रीय कीर्तनकार प्रज्ञा सोमणी, संघाच्या कार्यकर्त्या लीलाकाकू कर्वे, रेखा परांजपे, समिधा टिल्लू यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

श्रमिकआणि कामगारवर्गातील वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात आदिवासी बचत गटाच्या माध्यमातून सेवा देणार्‍या भारती कातकरी, तसेच चामडी वस्तू बनविणार्‍या सविता कारंडे, गॅस सिलिंडर पोहचवणार्‍या कल्पना हिलाल, आदिवासी उद्योजक कविता शिंगवा, अपंग संस्था चालविणार्‍या कल्पना भला, आरती रोकडे, रुग्णसेविका भारती शिंगोळे, अस्मिता पाईकराव, रत्नमाला प्रधान यांचा सन्मान करण्यात आला.सामाजिक क्षेत्रात कार्यरत मेघा बैकर, महिला उद्योजिका म्हणून शोभा पालशेतकर व माया म्हैसकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. अधिकारी म्हणून शासनाच्या सेवेत असलेल्या मंत्रालय अवर सचिव श्वेतांबरी खडे, तालुका कृषी अधिकारी ऋतुजा नारनवर आणि पोलीस उपनिरीक्षक शुभांगी देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला.

या वेळी भाजपचे नेरळ शहर अध्यक्ष अरुण नायक, भाजप प्रज्ञा प्रकोष्ठ कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक बल्लाळ जोशी, मिलिंद साने, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, नेरळ माजी शहर अध्यक्ष अनिल पटेल, अनिल जैन, महिला मोर्चा माजी शहर अध्यक्ष नीता कवाडकर, संभाजी गरूड आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कष्टकरी महिलांना नेरळ शहर अध्यक्ष नम्रता कांदळगावकर यांनी साडी-चोळी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेरळ शहर अध्यक्ष यांनी, तर सूत्रसंचालन आसावरी काळे यांनी केले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply