Breaking News

व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकातून दिव्यांगांमध्ये मतदान जनजागृती

नवी मुंबई : बातमीदार : भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात असून, नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रात दिव्यांगांकरिता चुनाव पाठशाला उपक्रमांतर्गत व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निरनिराळ्या माध्यमातून मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. यासोबतच मतदान प्रक्रियेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दिव्यांग मतदारांनीही आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त तथा लोकसभा निवडणूक नोडल अधिकारी  दादासाहेब चाबुकस्वार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत तायडे यांच्या माध्यमातून इटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांच्या सहयोगाने दिव्यांगांकरिता ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीनच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, तसेच मशीन हाताळण्यास देण्यात आली.

या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दिव्यांग व्यक्तींनी व्हीव्हीपॅटच्या कार्यपध्दतीविषयी समाधान व्यक्त केले व आपण मतदान करणारच आणि इतरांनाही करण्यास सांगणार, असा निश्चय व्यक्त केला.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply