पनवेल : रामप्रहर वृत्त
तरुणांना उद्योगात सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत उत्तर रायगड टीम प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारत महाराष्ट्र कोकण विभागाचे संयोजक विनय सावंत यांनी पनवेल येथे आत्मनिर्भर भारत कमिटीच्या पदाधिकार्यांना कामासंदर्भात मार्गदर्शन केले. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ’आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत विविध योजनांची माहिती आणि अंमलबजावणी करण्यासंदर्भातील चर्चा विनिमय या वेळी झाली. तसेच आत्मनिर्भर भारतचे महानियोजन अधिकारी चैतन्य जाधव यांच्यासोबतदेखील ऑनलाइन व्हिडीओ कॉलवर मिटिंग करून अनेक शंकांच निरासन करण्यात आले. या वेळी आत्मनिर्भर भारत उत्तर रायगडचे संयोजक आकाश भाटी, सहसंयोजक नूतन पाटील, अश्विन सातपुते, स्वप्नील मुकादम, किरण जाधव आणि राहुल गोतावळे आदी उपस्थित होते.