Breaking News

सत्य लपणार नाही -दरेकर

मुंबई : प्रतिनिधी

ज्या दिवसांचा परमबीर सिंह यांनी पत्रात उल्लेख केला आहे, त्या काळात अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते. मग सचिन वाझे देशमुखांना कधी भेटले?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलेला आहे. यावर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कितीही झाकले तरी सत्य लपणार नाही! ये पब्लिक है, ये सब जानती है! असे ट्विट करीत टीका केली आहे. राज्यात सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झालेला आहे. मात्र अद्यापतरी राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांची पाठराखण सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून, आता भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. अनिल देशमुखांना वाचवायचचे, असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय! 15 फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती, क्वारंटाइन काळात घेता येते? कितीही झाकले तरी सत्य लपणार नाही! ये पब्लिक है, ये सब जानती है! असे दरेकर यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटसोबत दरेकर यांनी अनिल देशमुख यांचे 15 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेचे ट्विटदेखील जोडले आहे. तसेच, खरंच स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा! असेदेखील दरेकर यांनी ट्विट केले आहे. केवळ अनिल देशमुख यांचा प्रश्न नाही, ते राज्याचे गृहमंत्री आहेत. परंतु राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना खासदार संजय राऊत बेताल वक्तव्य करत आहेत. असेदेखील दरेकर म्हणाले आहेत. दरम्यान, दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply