Breaking News

…तर चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा!

काँग्रेस अध्यक्ष पटोलेंचा राऊतांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसर्‍यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असे कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दांत पटोले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत धूसफूस असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची नवीन भक्कम आघाडी निर्माण होण्याची गरज आहे, असे वक्तव्य रविवारी केले होते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयाशाबाबतही ते बोलले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच भडकले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राऊतांवर शरसंधान साधले.
पटोले म्हणाले की, संजय राऊत काय बोलतात याकडे आम्ही लक्ष देत नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचे होते ते अगोदरच आम्ही सांगितलेले आहे. त्यांचा सामाना पेपर वाचणेदेखील आम्ही बंद केलेले आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले बरे, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे, पण दुसर्‍यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असे कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply