Breaking News

दिग्गजांचे भवितव्य पणाला; पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघांत गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील 10पैकी सात मतदारसंघांचा समावेश होता. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 60 ते 62 टक्के मतदान झाल्याचे यंत्रणेकडून सूचित करण्यात आले.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. एकूण 116 उमेदवार रिंगणात आहेत. 1 कोटी 30 लाख मतदार आहेत. त्यांच्यासाठी एकूण 15 हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण 11 हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.

गडचिरोलीतील 500हून अधिक अतिसंवेदनशील

मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे. काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत.

.

लोकशाहीत सगळ्यांनी     
मतदानाचा हक्क बजावावा. मतदारांचा उत्साह कौतुकास्पद आहे. पाच वर्षांत केलेल्या कामांवर मी नागपूरकरांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहे. या वेळी मी प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईन.
नितीन गडकरी, केेंद्रीय मंत्री


जगात भारताच्या लोकशाहीला मानले जाते. निवडणूक महत्त्वाची प्रक्रिया असून, देशाचा कारभार सक्षम हातात सोपविण्याचा निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply