Breaking News

मुंबईपाठोपाठ पुणे, पनवेलमध्येही होळी-धूळवड साजरीकरणास मनाई

पुणे, पनवेल ः प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात तसेच पनवेल महापालिका क्षेत्रात होळी आणि धूळवड खासगी व सार्वजनिक जागेत साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याआधी मुंबईत असा आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर प्रशानाकडून काही पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता पुण्यात होळी आणि धूळवड एकत्रपणे साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे.
पनवेल महापालिका हद्दीसाठीही आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मनाई आदेश काढला आहे. यानुसार होळी, धुलिवंदन खासगी व सार्वजनिकरित्या साजरी करण्यास मनाई आहे, तसेच मी जबाबदार या मोहिमेंतर्गत वैयक्तिकरीत्यासुद्धा शक्यतो हा उत्सव साजरा करणे टाळावे. याचे पालन करून नागरिकांनी महापालिकेस सहर्का करावे, अशी विनंती आहे; अन्यथा साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 कलम 188मधील तरतुदीनुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.    

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply