पनवेल ः रामप्रहर वृत्त
येथील अमरधाम स्मशानभूमीतील धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. याकडे विशेष लक्ष देऊन महापालिकेच्या माध्यमातून आणि भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत चिमणी बसविण्यात आली आहे. त्याचे उदघाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, अमर पाटील, प्रवीण पाटील, अजय बहिरा आदी उपस्थित होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper