Breaking News

अमन लॉज-माथेरान दरम्यान मेगाब्लॉक

मिनिट्रेनची शटल सेवा आज बंद

कर्जत : बातमीदार

पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन सोमवारी (दि. 20) दुपारी चार तास नॅरोगेज मार्गावरील दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवली जाणार आहे. एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेच्या मेंटेनन्स विभागाने दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक मागितला होता. मिनिट्रेनच्या नेरळ-माथेरातन या मार्गावरील अमन लॉज ते माथेरान स्टेशन या तीन किलोमीटरच्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या काळात शटल सेवा बंद असणार आहे, तसेच मिनिट्रेनची माथेरान आणि नेरळ येथून सोडली जाणारी प्रत्येकी एक फेरी रद्द करण्यात आली आहे.

नेरळ-माथेरान या 21 किलोमीटर नॅरोगेज मार्गावर  माथेरान राणी (मिनीट्रेन) चालविली जाते. पर्यटकांना या मिनिट्रेनचे मोठे आकर्षण आहे. त्यामुळे मिनिट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटक थांबून राहतात. सध्या उन्हाळा सुरु असून, थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांचे लोंढे येत आहेत. मात्र सोमवारी चार तास मिनिट्रेन बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. त्या दिवशी नॅरोगेज मार्गावर सकाळी 9.45 पासून दुपारी 1.45 पर्यत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात अमनलॉज ते माथेरान या स्थानकादरम्यान नॅरोगेज मार्गावर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्या काळात रूळ बदलणे, सायडिंग ट्रॅक, लाकडी सिग्नल यंत्रणा तसेच दोन्ही स्थानकातील किरकोळ कामे  केली जाणार आहेत.

या मेगाब्लॉकमुळे नेरळ येथून सकाळी 8.50ला सोडली जाणारी मिनीट्रेनची फेरी रद्द करण्यात आली आहे. तर माथेरान येथून सोडली जाणारी 9.20ची फेरी रद्द करण्यात आली आहे. मात्र मेगाब्लॉकच्या चार तासांच्या काळात अमनलॉज ते माथेरान स्टेशन या दरम्यान शटल गाडीच्या फेर्‍या बंद राहतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या ऑपरेशन विभागाचे लाल कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply