Breaking News

मनीष नरवालचे विक्रमी सुवर्णपदक

अल एन ः वृत्तसंस्था

यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करीत नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम मोडला. त्याच्या आधी सर्बियाच्या रास्तको जोकिकने 2019मध्ये ओसीजेक येथे 228.6 गुण मिळवत विक्रम रचला होता. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेत 24 देशांतील 120 खेळाडूंनी भाग घेतला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply